EVENT RULES

स्पर्धेबाबतचे नियम

  • स्पर्धक संख्या

       प्रत्येक विद्यापीठातून ३८ (अडोतीस) विद्यार्थ्यांचा संघ व ०२ (दोन) व्यवस्थापक असे एकूण ४० (चाळीस) व्यक्तींचा संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. साथसंगत करणारे सर्व व्यक्ति शक्यतोवर विद्यार्थी असावेत. साथसंगत करणार्‍या विद्यार्थी कलावंतांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. तथापि साथसंगत करण्याकरिता विद्यार्थी अनुपलब्ध असल्यास व्यावसायिक कलावंतांचा समावेश करता येईल. सहभागी विद्यापीठांना विशेष विनंती की, उपरोक्त संख्येशिवाय कोणत्याही अन्य व्यक्तींना स्पर्धेकरिता सोबत आणु नये. सदर व्यक्तींना / निवास स्थानी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.

 

  • संघ प्रभारी प्रमुख

            प्रत्येक विद्यापीठाने संघामध्ये ०२ (दोन) प्रभारी प्रमुखांना संघ प्रमुख म्हणून नियुक्त करावे. महिला कलावंतांकरिता महिला व्यवस्थापकांची नियुक्ती करणे बंधनकारक राहील. या व्यक्तींचा समावेश वर नमूद ४० (चाळीस) च्या संख्येत गणला जावा.

 

  • ओळखपत्रे

       प्रत्येक विद्यापीठे संघातील सर्व कलावंतांना मान्यता प्राप्त व अधिकृत व्यक्ति / अधिकारी यांचे स्वाक्षरी व शिक्क्यांनीशी ओळखपत्र वितरित करतील. सदर   ओळखपत्रांशिवाय कलावंतांना कला सादरीकरणाकरिता किंवा स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.

 

  • विद्यापीठ ध्वज व पुरस्कार

       प्रत्येक विद्यापीठाच्या प्रभावी प्रमुखांनी सभास्थानी त्यांच्या विद्यापीठाचे अधिकृत ०२ (दोन) ध्वज नोंदणीकक्षामध्ये जमा करावे लागतील. ज्या विद्यापीठांनी गेल्या वर्षी विविध फिरते चषक अथवा पुरस्कार प्राप्त केलेले असतील त्यांनी सर्व पुरस्कार यजमान विद्यापीठांकडे स्पर्धेच्या १५ दिवस अगोदर जमा करणे अनिवार्य राहील.

 

  • प्रवास खर्च

       प्रत्येक सहभागी विद्यापीठाला आवश्यक असलेला प्रवास खर्च स्वत: वहन करावा लागेल.

 

  • भोजन

सहभागी संघातील प्रत्येक अधिकृत कलावंतांना दिनांक ०६ /१२/२०१८ रोजी रात्री ते ११/१२/२०१८ दुपार पर्यन्त खानपान उपलब्ध करून दिले जाईल.

 

  • निवास व्यवस्था

       सहभागी संघातील सर्व कलावंत व प्रभारी प्रमुखांना आयोजक विद्यापीठातर्फे निवास व्यवस्था नि:शुल्कपणे पुरविली जाईल. सदर व्यवस्था विद्यापीठ परिसरात उपलब्ध असलेल्या विविध अतिथिगृह, शेतकरी भवन, शेतकरी निवास, वसतिगृहे इत्यादींमध्ये केली जाईल.

 

  • पेहराव

       नाशिक शहराचे डिसेंबर महिन्यातील तापमान साधारणत: थंड असते. त्यामुळे सहभागी कलावंतांनी स्वत:ची चादर किंवा लोकरीचे कपडे आणावेत. तसेच स्वत:स आवश्यक असलेली औषधे आणि तले, किल्ली आणावी.

 

  • अनुशासन

       सहभागी होणार्‍या कोणत्याही कलावंताचे वर्णन हे वर नमूद तरतुदींचे प्रमाण नसल्यास नियमांनुसार कार्यवाही केली जाईल व त्याप्रमाणे सदर संघ हा पुढील युवा महोत्सवातून बाद ठरवला जाईल. कोणत्याही संघाचे प्रभारी प्रमुख अथवा कलावंत कोणत्याही घटनेविरोधात माध्यमांकडे स्वत:हून जाणार नाही. मद्य प्राशन करणे, मुलींची छेडखणी करणे, नियुक्त करण्यात येणार्‍या पंचावर प्रभाव अथवा दबाव आणण्याकरिता प्रयत्न करणे, अशोभनिय वर्तन करणे आदि बाबी परिसरामध्ये घडल्यास नियमामध्ये कार्यवाही केली जाईल.

 

  • स्टॅम्प साईज फोटोग्राफ

       सहभागी सर्व कलावंत व प्रभारी प्रमुखांनी स्पर्धास्थानी स्टॅम्प साईज फोटोग्राफ जवळ बाळगणे.